पीटीआय
राष्ट्रीय

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये २० पोलिसांचा समावेश आहे. या हिंसाचारात सीओ अनुज चौधरी आणि एसपीचे पीआरओ यांच्या पायाला गोळी लागली.

Swapnil S

संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये २० पोलिसांचा समावेश आहे. या हिंसाचारात सीओ अनुज चौधरी आणि एसपीचे पीआरओ यांच्या पायाला गोळी लागली.

हिंसाचारानंतर पुढील २४ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण असून, जामा मशिदीकडे जाणाऱ्या तिन्ही मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. या हिंसाचारानंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. सपा खासदार बुर्के यांच्या निवासस्थान परिसरात दगडफेकीची घटना घडली.

पोलिसांच्या गोळीबारामुळे तीन तरुणांचा मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, पोलीस आयुक्तांनी हा आरोप नाकारत सांगितले की, हे मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाले नसून, हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सदर तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रविवारी सकाळी ६.३० वाजता डीएम-एसपीसह एक टीम जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोहोचली होती. या टीमला पाहून मुस्लिम समाजातील लोक संतापले व काही वेळातच दोन ते तीन हजारांहून अधिक लोक जामा मशिदीबाहेर जमा झाले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता काही लोकांनी दगडफेक केली. यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

जमावाकडून दगडफेक, जाळपोळ

अचानक दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नंतर लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. संतप्त जमावाने ३ चारचाकी आणि ५ दुचाकी वाहने पेटवून दिल्या. अनेक तास परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती. या घटनेनंतर रस्त्यांवरून ४ ट्रॉली दगड हटवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

श्रीमंत ऋषभ पंत! सर्वाधिक २७ कोटींची बोली, अय्यर दुकलीसाठीही संघमालकांनी मोजले कोटी रुपये