एक्स @Uppolice
राष्ट्रीय

केझेडएफचे तीन दहशतवादी ठार

पंजाबच्या सीमावर्ती भागातील गुरदासपूर येथे पोलीस चौकीवर करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभाग असलेले खलिस्तान झिंदाबाद फोर्सचे (केझेडएफ) तीन दहशतवादी उत्तर प्रदेशातील पिलिभीत जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत ठार झाले.

Swapnil S

पिलिभीत/चंडीगड : पंजाबच्या सीमावर्ती भागातील गुरदासपूर येथे पोलीस चौकीवर करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभाग असलेले खलिस्तान झिंदाबाद फोर्सचे (केझेडएफ) तीन दहशतवादी उत्तर प्रदेशातील पिलिभीत जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत ठार झाले. पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी पंजाब पोलि‍सांनी सकाळी आरोपींना अटक केल्याची माहिती दिली होती. मात्र नंतर उत्तर प्रदेश पोलि‍सांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्पष्ट केले. मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख पटली असून गुरुविंदर सिंग (२५), वीरेंद्र सिंग उर्फ रवी (२३) आणि जसन प्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग (१८) अशी तिघांची नावे असून हे सर्व गुरुदासपूर येथील रहिवासी आहेत.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचे समर्थन असलेल्या खलिस्तान झिंदाबाद फोर्स दहशतवादी मॉड्यूलविरोधात हे मोठे यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त मोहिमेदरम्यान तीन मॉड्यूल सदस्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर चकमक झाली. या चकमकीत जखमी झालेल्या तिघांना तत्काळ सीएचसी पुरानपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी या तिघांकडून दोन एके-४७ रायफली आणि दोन ग्लॉक पिस्तुलेही जप्त केली आहेत. या चकमकीत दोन पोलीस हवालदार सुमित राठी आणि शेहनवाज हे दोघे या जखमी झाले आहेत. सदर दहशतवादी आणि पोलीस पथक एकमेकांसमोर येताच या तिघांनी पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन संशयित जखमी झाले. नंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे