राष्ट्रीय

Video : आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी थेट AIIMS च्या वार्डमध्ये घातली बोलेरो

एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आपली बोलेरो गाडी चक्क हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर घातली आणि....

Suraj Sakunde

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आपली बोलेरो गाडी थेट AIIMS च्या वॉर्डमध्ये घातल्याचा धक्कादायक प्रकार उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे मंगळवारी घडला आहे. विनयभंगाचा आरोप असलेल्या एका नर्सिंग अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आपली बोलेरो गाडी चक्क हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर घातली. पोलिसांच्या या कृतीनं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कित्येक रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिसांची गाडी विनयभंगाचा आरोप असलेल्या व्यक्तीला पकडण्यासाठी थेट ऋषिकेश येथील एम्स हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये प्रवेश केल्याचं दिसत आहे. अचानक झालेल्या या कृतीनं वॉर्डमधील रुग्ण तसेच इतर लोकांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे पोलिसांच्या जीपला वाट करून देण्यासाठी कित्येक बेड हलवावे लागले.

नेमकं काय आहे प्रकरण:

एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी एम्स-ऋषिकेशमधील एका नर्सिंग अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिस आले होते. त्यावेळी त्यांची बोलेरो गाडी हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये प्रवेश करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रविवारी 19 मे रोजी सायंकाळी आरोपी सतीश कुमार याने रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरांचा विनयभंग केल्याचे सांगण्यात येत आहे. कुमारने महिला डॉक्टरला अश्लील एसएमएस पाठवल्याचेही वृत्त आहे.

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका