संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

टोमॅटो झाला महाग; कर्नाटकात १०० रुपये किलो; अन्य राज्यांतही दर वाढण्याची शक्यता

Swapnil S

बंगळुरू : कांदा, बटाटा या रोजच्या जेवणातील पदार्थांचे ५० ते ६० रुपये किलोवर गेलेले असतानाच आता टोमॅटो किलोमागे १०० रुपयांपर्यंत महागला आहे. कर्नाटक, तेलंगणात काही शहरांमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपयांवर गेला आहे, तर मुंबईत टोमॅटो ६० ते ७० रुपये किलोने मिळत आहे. देशाच्या विविध भागात टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

कर्नाटकात म्हैसूर येथे टोमॅटोचे दर १०० रुपयांच्या आसपास पोहचले आहेत. देशातील १७ राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव ५० रुपयांच्या वर गेला आहे, तर ९ राज्यांत टोमॅटो ६० रुपये किलोपेक्षा जास्त आहे, तर ४ राज्यांत टोमॅटोचा भाव ७० रुपयांपेक्षा जास्त आहे. उष्णतेची लाट आणि टोमॅटोचे घटलेल्या उत्पादनामुळे टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. देशातील केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारमध्ये टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त