राष्ट्रीय

टोयोटाची भारतात हायब्रीड ईव्हीची चाचणी सुरू

ही कार २० ते १०० टक्के मिश्रित इथेनॉल आणि इलेक्टि्रक पॉवरसह १०० टक्के पेट्रोलवर देखील चालते

वृत्तसंस्था

मंगळवारी देशातील पहिले फ्लेक्सी-फ्यूल स्ट्राँग हायब्रिड इलेक्टि्रक व्हेइकल्स नवी दिल्लीत लाँच झाले. त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे फ्लेक्सी फ्यूल इंजिन वाहन निर्मितीचे स्वप्न साकार झाले आहे.

ही कार २० ते १०० टक्के मिश्रित इथेनॉल आणि इलेक्टि्रक पॉवरसह १०० टक्के पेट्रोलवर देखील चालते. टोयोटा या जपानी ऑटो कंपनीचा पायलट प्रोजेक्ट गडकरींनी लॉन्च केला. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत हे वाहन पूर्णपणे 'इथेनॉल' या पर्यायी इंधनावर धावू शकते. प्रकल्पाच्या शुभारंभाच्या वेळी, टोयोटा कोरोला अल्टीसचे अनावरण करण्यात आले. ही कार टोयोटा ब्राझीलमधून प्रायोगिक प्रकल्पासाठी आयात केली गेली.

गडकरी म्हणाले की, भारतातील प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब आहे आणि वाहतूक क्षेत्र प्रदूषणाला कारणीभूत आहे. म्हणून, इथेनॉल आणि मिथेनॉल सारख्या जैव-इंधनांवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. गडकरींशिवाय केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे, भूपिंदर यादव आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत