काँग्रेसमध्ये येण्याचे ममतांना निमंत्रण? विलीनीकरणाच्या चर्चा, तृणमूलचा इन्कार Photo : X
राष्ट्रीय

काँग्रेसमध्ये येण्याचे ममतांना निमंत्रण? विलीनीकरणाच्या चर्चा, तृणमूलचा इन्कार

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि नंतरची बंडखोरी या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यासमोर ठेवला आहे अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि नंतरची बंडखोरी या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यासमोर ठेवला आहे अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्या पाठोपाठ राहुल गांधी व अभिषेक बॅनर्जी यांचीही भेट झाली. ही भेट सुमारे दीड तास चालली. या संदर्भात गुरुवारी काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली आहे. तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा, त्याबदल्यात तुम्हाला काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले जाईल, यासह त्यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाचं महसचिव केले जाईल, असे सोनिया यांनी ममतांना सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले जाईल, यासह त्यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाचं महसचिव केले जाईल, असे सोनिया यांनी ममतांना सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी बुधवारी या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या असून, असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या चर्चांचा तीव्र शब्दांत निषेध करत या केवळ 'दंतकथा' आणि 'आधारहीन' अफवा असल्याचे सांगितले.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये