राष्ट्रीय

पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत

पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याच्या आरोपावरून हरयाणाच्या पलवल पोलिसांनी वसीम अक्रम आणि तौफीक या दोन यूट्युबरना अटक केली आहे. पाकिस्तानशी हातमिळवणी करून हे दोघे हेरगिरीचे नेटवर्क चालवत असल्याचे समोर आले. यावर्षीच्या सुरुवातीला प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर हेरगिरीचे प्रकरण चर्चेत आले.

Swapnil S

चंडीगड : पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याच्या आरोपावरून हरयाणाच्या पलवल पोलिसांनी वसीम अक्रम आणि तौफीक या दोन यूट्युबरना अटक केली आहे. पाकिस्तानशी हातमिळवणी करून हे दोघे हेरगिरीचे नेटवर्क चालवत असल्याचे समोर आले. यावर्षीच्या सुरुवातीला प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर हेरगिरीचे प्रकरण चर्चेत आले.

पाकिस्तानी उच्चायुक्तालय केवळ व्हिसा देण्याचे काम करत नाही तर ते भ्रष्टाचार आणि हेरगिरीसाठी शस्त्र बनले आहे हे स्पष्ट होऊ लागले आहे.

पलवलमध्ये पकडलेले वसीम आणि तौफीक लोकांकडून पैसे घेऊन त्यांना पाकिस्तानी व्हिसा देण्याचे आश्वासन देत होते. जे पैसे ते कमवायचे, त्यातील मोठा हिस्सा पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देत होते. नावाचा कर्मचारी हे आयएसआय एजेंटपर्यंत पोहचवायचा. हे एजेंट टूरिस्ट उच्चायुक्तालयातील व्हिसावर भारतात यायचे आणि इथे दानिश राहून त्यांच्या हेरगिरीचे काम करीत पैसे होते.

वसीम अक्रमने सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला व्हिसा पाहिजे होता, तेव्हा तो पहिल्यांदा जाळ्यात अडकला. त्याचा व्हिसा रद्द झाला होता परंतु पाकिस्तानी हाय कमिशनमधील कर्मचारी जाफर उर्फ मुजम्मिल हुसैन याला २० हजारांची लाच दिल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता. मे २०२२ मध्ये तो पाकिस्तानच्या कसूरला गेला होता. तिथून परतल्यानंतर तो जाफरसोबत व्हॉट्सअप संपर्कात होता.

त्यानंतर त्याने पाकिस्तानी व्हिसा देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल करण्याचे काम सुरू केले. त्याच्या खात्यात ४-५ लाख जमा झाले. त्यातील मोठी रक्कम जाफर आणि इतर कर्मचाऱ्यांना मिळत होती.

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

चेंबूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३३ जण ताब्यात

अंगणवाडी केंद्रे वाढणार; बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन