राष्ट्रीय

टाटा समूहाच्या दोन कंपन्या कर्नाटकात २,३०० कोटी गुंतवणार

भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असेल आणि संपूर्ण एमआरओसाठी दरवाजे उघडतील, असा दावा पाटील यांनी केला.

Swapnil S

बंगळुरू : टाटा समूहाच्या कंपन्या एअर इंडिया आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) यांनी कर्नाटकमध्ये सुमारे १,६५० लोकांना रोजगार देणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये २,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, असे सोमवारी येथे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी झालेल्या स्वाक्षरी समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विशाल व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले की, एअर इंडियाची बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरफ्रेम देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधा १,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक योजनेसह स्थापन करण्याची योजना आहे. त्यात १,२००लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असेल आणि संपूर्ण एमआरओसाठी दरवाजे उघडतील, असा दावा पाटील यांनी केला. एअर इंडिया बंगळुरू विमानतळावर ‘एव्हिएशन हब’ तयार करेल. त्यामुळे आर्थिक उलाढालीत आणि बंगळुरूमार्गे हवाई वाहतूक वाढेल, असेही ते म्हणाले.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

४० ठार, १०० जखमी; नववर्षाच्या पार्टीदरम्यानच बारमध्ये भीषण स्फोट; स्वित्झर्लंडच्या आलिशान 'स्की रिसॉर्ट'मध्ये मोठी दुर्घटना

एबी फॉर्म गिळला की फाडला? पुण्यातील शिंदेसेनेच्या उमेदवाराने स्वतः केला खुलासा, म्हणाले - "भावनेच्या भरात माझ्याकडून...

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा