बेरोजगार पदवीधरांना महिना ५ हजार; पाच वर्षांत २५ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

बेरोजगार पदवीधरांना महिना ५ हजार; पाच वर्षांत २५ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, यावेळी जेन झीवर जास्त लक्ष दिले आहे.

Swapnil S

लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, यावेळी जेन झीवर जास्त लक्ष दिले आहे. सत्तेवर आल्यास पुढील पाच वर्षांत २५ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आणि बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा ५ हजार रुपयांचा 'निर्वाह भत्ता' देण्याचे आश्वासनही पक्षाने दिले आहे.

इतर क्षेत्रांत २ ते ३ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. सरकारी विभागांमधील सर्व रिक्त पदे ठरावीक कालमर्यादेत भरली जातील आणि भरती परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले जाईल.

सर्व परीक्षा वेळेवर पार पडतील याची खात्री देण्यासोबतच, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. समाजवादी पक्षाने सत्तेत आल्यास 'समाजवादी कॅन्टीन' सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, जेथे पाच रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाणार असून ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचेही त्यांनी वचन दिले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग