राष्ट्रीय

धक्कादायक! मधुचंद्राच्या रात्री इंजिनिअर पतीने 'त्या' गोळ्या खाल्ल्या, ७ दिवसांनंतर पत्नीचा मृत्यू

Swapnil S

हमीरपूर: उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री इंजिनीअर पतीने सेक्सवर्धक गोळ्या खाऊन शरीरसंबंध ठेवल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या रात्री पतीने कामोत्तेजक गोळ्या खाल्ल्याने महिलेची प्रकृती अत्यंत खालावली होती. या महिलेला बुधवारी (७ फेब्रुवारी) रुग्णालयात दाखल करण्यात आले असता शनिवारी (१० फेब्रुवारी) रुग्णालय प्रशासनाने तिला मृत घोषित केले. सोमवारी मृत महिलेच्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर, घराला टाळं ठोकून पतीने कुटुंबासह गाव सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी (३ फेब्रुवारी) उराई येथील इंजिनिअर तरुणाशी या महिलेचा विवाह झाला. महिलेच्या आई-वडिलांचा आधीच मृत्यू झाला असल्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्या तिच्या भावाने तिच्या लग्नाची जय्यत तयारी केली होती. शनिवारी (४ फेब्रुवारी) 'पाठवणी'नंतर ही महिला सासरच्या घरी गेली.

या महिलेच्या वहिनीने सांगितल्यानुसार, ७ फेब्रुवारी रोजी ती तिच्या पतीसोबत कानपूरमध्ये एका लग्नासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या नणंदच्या सासरकडील मंडळीचा फोन आला आणि मुलीच्या आजारपणाबाबत न सांगता फसवून लग्न लावून दिलं, असा आरोप त्यांनी केला. तसेच, तिला सतत उलट्या होत असून आजारी असल्याचे सांगितले. वहिनीने सांगितले की, हा फोन आल्यानंतर आम्ही कानपूरमधील लग्न सोडून उराईला पोहोचले. तेथून त्यांनी नणंदला कानपूरमधील खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार झाले, पण काहीही उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान वहिनीने तिला आजारपणाचं कारण विचारलं असता, पतीने सेक्सवर्धक गोळ्या खाऊन संबंध ठेवल्यामुळे ही हालत झाल्याचे तिने सांगितले.

यानंतर नातलगांनी तिला स्त्रीरोगतज्ञाकडे नेले. पण, तपासणीनंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रमाणे संबंध बनवल्याचे स्त्रीरोगतज्ञाने सांगितले. तिला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. त्यामुळे संसर्ग पसरला आणि तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. सोमवारी मृत महिलेच्या भावाने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली असून पोलिसांकडे लेखी तक्रारही केली आहे. आरोपी पतीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल