राष्ट्रीय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थोडक्यात बचावले

अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून योगी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. वाराणसीवरून लखनऊला जाताना योगींच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वाराणसीत आले होते. वाराणसीहून लखनऊला जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकल्यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून योगी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली

जुलैमध्ये पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यापूर्वी विकासकामांचा आढावा आणि पाहणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर होते. शनिवारी सायंकाळी विकासकामांचा आढावा आणि पाहणी केल्यानंतर योगी हेलिकॉप्टरने लखनऊला जात होते. उड्डाणाच्या काही वेळातच पक्षी धडकल्यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. इमर्जन्सी लँडिंगनंतर पर्याय म्हणून योगींना दुसरे हेलिकॉप्टर पाठवले आहे. जेव्हा एखाद्या मंत्र्यासोबत अशा प्रकारची घटन घडते, तेव्हा प्रोटोकॉल अंतर्गत हेलिकॉप्टर उतरवले जाते. तांत्रिक पथकाकडून हेलिकॉप्टरची तपासणी केली जाते. सर्वकाही ठीक आहे याची खात्री झाल्यानंतरच हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची परवानगी दिली जाते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक