चमोली : बद्रीनाथहून देहरादूनला जाणारे एक हेलिकॉप्टर शुक्रवारी दुपारी जोशीमठाजवळ कोसळून झालेल्या दुर्घटनेत वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. हे हेलिकॉप्टर दुपारी सुमारे १:१४ वाजता बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्रधारासाठी निघाले होते.
जोशीमठ खोऱ्यावरून उडत असताना त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर ट्रॅकिंग सिस्टीमने त्याचे स्थान गमावले. जेव्हा उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होत असल्याने हवामान खराब होते त्यावेळी ही घटना घडली. अपघातावेळी डोंगरावर उपस्थित असलेल्या लोकांनी हेलिकॉप्टर खाली पडत असल्याचा व्हिडिओ बनवला.
हे हेलिकॉप्टर ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचेहोते. हेलिकॉप्टरमध्ये पायलट कॅप्टन हिमांशू, प्रताप, अरुण, शंकर गौडा, सुधीर के. आणि एच.एस. नटराज यांच्यासह पाच प्रवासी होते. या अपघातानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून ट्रान्स भारत एव्हिएशनची सर्व हेलिकॉप्टर्स थांबवण्यात आली आहेत.