‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ची बंगळुरूत बांधणी 
राष्ट्रीय

‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ची बंगळुरूत बांधणी

बंगळूरुमध्ये बुलेट ट्रेनच्या धर्तीवर एक कारखाना उभारण्यात आला असून ताशी २८० किलोमीटर इतका सर्वोच्च वेग गाठण्यास सक्षम असलेली वंदे भारत बुलेट ट्रेनची बांधणी केली जात आहे.

Swapnil S

बंगळुरू : बंगळूरुमध्ये बुलेट ट्रेनच्या धर्तीवर एक कारखाना उभारण्यात आला असून ताशी २८० किलोमीटर इतका सर्वोच्च वेग गाठण्यास सक्षम असलेली वंदे भारत बुलेट ट्रेनची बांधणी केली जात आहे. स्वदेशी बनावटीची बी-२८ बुलेट ट्रेन बंगळूरुमध्ये तयार केली जाणार आहे.

आयसीएफ आणि बीईएमएल यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केल्या जाणाऱ्या या ट्रेनच्या निर्मितीसाठी विशेष आदित्य कॉम्प्लेक्स विकसित करण्यात आले आहे. या कारखान्यात तयार झालेली पहिली प्रोटोटाइप ट्रेन पुढील वर्षी रुळांवर दिसेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आदित्य विशेष संकुलाची निर्मिती ही स्वदेशी अभियांत्रिकीचा वापर करून हायस्पीड ट्रेन्स, किंवा ‘बी-२८ ट्रेन्स’ तयार करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या कारखान्यात तयार होणाऱ्या बी-२८ ट्रेनला ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ म्हटले जात आहे. ही ट्रेन वंदे भारत ट्रेनसारखी दिसत असल्यामुळे तिला हे नाव देण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने या ट्रेनला ‘आत्मनिर्भर भारताची स्वदेशी बुलेट ट्रेन’ असे नाव दिले आहे.

बंगळुरू ते चेन्नई प्रवास ७३ मिनिटांत

बंगळुरू ते चेन्नई हा प्रवास वंदे भारत बुलेट ट्रेनद्वारे ७३ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. बंगळुरू आणि चेन्नईदरम्यान रेल्वेने ३५३ किलोमीटरचे अंतर शताब्दी एक्स्प्रेसद्वारे कापायला सव्वापाच तास लागतात. नियमित मेल/एक्स्प्रेस ट्रेनला हेच अंतर कापण्यासाठी साडेपाच ते सहा तास लागतात. रेल्वेमंत्र्यांच्या दाव्यानुसार, बी-२८ ट्रेन हे अंतर केवळ ७३ मिनिटांत पार करेल. तसेच दिल्ली ते पाटणा हे रेल्वेचे अंतर १००० किलोमीटर आहे. ही ट्रेन ताशी २५० किलोमीटर वेगाने धावली तरी, दिल्ली ते पाटणा हा प्रवास चार तासांत पूर्ण होऊ शकतो.

राज्यात सूर्य आग ओकतोय; उष्माघाताने परभणीत एकाचा मृत्यू, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे

१७ जागांसाठी जूनमध्ये रणधुमाळी; विधान परिषद स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

निफाडच्या भोंदूबाबाने आपला प्रपंच केला उद्ध्वस्त...

ट्रम्प पुन्हा हल्ल्यातून बचावले; व्हाईट हाऊसच्या डिनरदरम्यान गोळीबार, हल्लेखोराला अटक