'वंदे मातरम्'च्या १५० वर्षांचा उत्सव साजरा करा! 'मन की बात' मधून पंतप्रधान मोदींचे आवाहन एएनआय
राष्ट्रीय

'वंदे मातरम्'च्या १५० वर्षांचा उत्सव साजरा करा! 'मन की बात' मधून पंतप्रधान मोदींचे आवाहन

राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा उत्सव अविस्मरणीय बनवा आणि या गीतातील मूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना केले.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा उत्सव अविस्मरणीय बनवा आणि या गीतातील मूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना केले.

‘मन की बात’ या आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ भारताचे तेजस्वी आणि भव्य चित्र रेखाटते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या आणि १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम गायिलेल्या या गीताच्या १५० वर्षांच्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

३० मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील विविध भागांत नागरिकांनी केलेल्या अनोख्या उपक्रमांचा उल्लेख केला. गुजरातमधील खारफुटी वृक्षांचे पुनरुज्जीवन, छत्तीसगडमधील ‘गार्बेज कॅफे’ उपक्रम आणि बंगळुरूमधील तलावांचे पुनरुज्जीवनाचे प्रयत्न आदींची त्यांनी माहिती दिली.

मोदी यांनी ‘बीएसएफ’ आणि ‘सीआरपीएफ’ या अर्धसैनिक दलांकडून स्थानिक भारतीय श्वानांच्या प्रजातींचा समावेश करण्याच्या उपक्रमाचेही कौतुक केले. ‘आपल्या स्वदेशी श्वानांनी अप्रतिम शौर्य दाखवले आहे. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात गस्तीदरम्यान ‘सीआरपीएफ’च्या स्थानिक जातीच्या श्वानांनी ८ किलो स्फोटके शोधून काढली होती,’ असे मोदी म्हणाले.

‘बीएसएफ’ आणि ‘सीआरपीएफ’ने रॅम्पूर हाउंड, मुदहोल हाउंड, मोंग्रेल, कोम्बई आणि पंडिकोन या भारतीय जातींच्या श्वानांचा आपल्या दलात समावेश केला आहे. या काही प्रजाती ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकता नगर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित परेडमध्ये सहभागी होणार आहेत.

मोदी यांनी संस्कृत भाषेला नवसंजीवनी मिळाल्याचेही नमूद केले. ‘संस्कृत भाषेत आणि संस्कृतमध्ये बोलणाऱ्या तरुणांची संख्या सोशल मीडियावर वाढत आहे. अनेक तरुण आपल्या चॅनेल्सद्वारे संस्कृत शिकवतात. त्यापैकी एक आहे यश साळुंके. तो कंटेंट क्रिएटर आणि क्रिकेटपटू दोन्ही आहे. त्याने संस्कृतमध्ये क्रिकेट खेळताना बनवलेला रील अत्यंत लोकप्रिय ठरला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

स्वदेशी वस्तूंची जोरदार खरेदी

जीएसटी बचत उत्सवामुळे जनतेत मोठा उत्साह आहे. त्यामुळे यंदा सणासुदीच्या काळात बाजारात जनतेने स्वदेशी वस्तूंची जोरदार खरेदी केली, असे त्यांनी नमूद केले.

Mumbai : सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ मोठा अपघात; लोकलच्या धडकेत २ महिलांचा मृत्यू, २ जण जखमी

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन; कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल, १ तास लोकलसेवा विस्कळीत

ऑनलाइन बेटिंग प्रकरण : शिखर धवन आणि सुरेश रैनाला ED चा दणका; ११.१४ कोटींची मालमत्ता जप्त

बुलढाणा हादरले! दारूच्या नशेत मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, चौकशी समितीची स्थापना