राष्ट्रीय

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आयोगाकडून सुरू

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने बुधवारी एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने बुधवारी एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली. गृह मंत्रालयाने २२ जुलै रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. त्यामुळे आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आयोगाने सांगितले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संविधानाच्या कलम ६८ अंतर्गत, उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे, नियमांनुसार ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी लागते. यासंदर्भात, निवडणूक आयोगाने आता एक अधिसूचना जारी केली आहे.

उपराष्ट्रपती कोण निवडतो?

उपराष्ट्रपतीची निवड ‘इलेक्टोरल कॉलेज’द्वारे केली जाते, ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा आणि राज्यसभा) निवडून आलेले आणि नामांकित सदस्य असतात. जर आपण नामांकनाबद्दल बोललो तर, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला किमान २० प्रस्तावक आणि २० समर्थक (निर्वाचक मंडळाचे सदस्य) यांचे समर्थन आवश्यक असते. त्यांना नामांकनासोबत ५०,००० रुपयांची सुरक्षा रक्कमही जमा करावी लागते.

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर

'पीओके'तील जनता म्हणेल, आम्ही भारतवासी; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास