राष्ट्रीय

Video "पनीर का चक्कर बाबू भैय्या", मटर पनीरमध्ये पनीर नसल्याने लग्नात तुंबळ हाणामारी

व्हि़डिओतील तुंबळ हाणामारी बघून हा वाद फक्त मटर पनीरमध्ये पनीर नसल्याने झाला याचा कोणी अंदाज देखील लावू शकणार नाही.

Swapnil S

लग्न म्हटले की रुसवे-फुगवे, वाद-विवाद आलेच. मान-पानावरुन, जेवण कमी पडल्याने, जेवणाला उशीर झाल्याने लग्नात वाद होतात. कधी-कधी किरकोळ वाद आणि नाराजीचे रुपांतर भांडण किंवा मारामारीत देखील होते. अशीच एक घटना दिल्लीतील एका लग्न समारंभात घडली आहे. लग्नातील मेनूत मटर पनीरच्या भाजीत पनीर नसल्याने हा सगळा राडा झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ दिल्ली येथील लग्नातील असल्याचे सांगितले जात आहे. या लग्नात जेवणासाठी असलेल्या मेन्यूत मटर पनीरची भाजी होती. या भाजीत पनीर न आढळल्याने वऱ्हाड नाराज झाले. त्यांनी यावरुन त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यानंतर हा वाद टोकाला गेला आणि दोन्हीकडच्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु झाली.

या व्हिडिओत दोन्ही बाजूचे वऱ्हाडी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. जेवणासाठी लावण्यात आलेले टेबल देखील अस्ताव्यस्त झाले असून दोन्ही बाजूची मंडळी एकमेकांवर खुर्च्या फेकत आहेत. एक्सवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून याला 'मटर पनीरच्या भाजीत पनीर नसल्याने नवरदेव आणि नवरी यांच्याकडील पाहुण्यांमध्ये वाद' असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे हा सर्व वाद भाजीत पनीर नसल्याने झाल्याची बाब समोर आली आहे. या व्हि़डिओतील तुंबळ हाणामारी बघून हा वाद फक्त मटर पनीरमध्ये पनीर नसल्याने झाला याचा कोणी अंदाज देखील लावू शकणार नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक जण म्हणाला की, "तिसरे महायुद्ध हे पनीरसाठीच लढले जाईल." तर, दुसऱ्या युजरने म्हटले की, "खुर्च्या तोडून पनीर वसूल करत आहेत." एकाने तर "पनीर नाही तर लग्न नाही", अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. एका व्यक्तीने "पनीर का चक्कर बाबू भैय्या" अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली