प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच; एका आंदोलकाचा गोळीबारात मृत्यू, ‘सीएपीएफ’च्या ५० तुकड्या पाठवणार

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच असून जिरीबाम जिल्ह्यात एका मैतेई आंदोलकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

Swapnil S

इम्फाळ : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच असून जिरीबाम जिल्ह्यात एका मैतेई आंदोलकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘सीएपीएफ’च्या ५० कंपन्या (५ हजार जवान) मणिपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्यात अमित शहा यांना अपयश आल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता राज्यातील महाविद्यालय, शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. ‘एनआयए’ मणिपूर हिंसाचाराशी संबंधित तीन प्रकरणांची चौकशी करणार आहेत.

मणिपूरच्या जनतेने मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह आणि १३ आमदारांच्या घरांवर हल्ले केले. मणिपूरमध्ये तीन महिला व तीन मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर जोरदार आंदोलन सुरू आहे. वाढता हिंसाचार पाहता इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, बिष्णुपूर, थौउबल, काकचियांग, कांगपोकपी आणि काकचियांग जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ‘सीआरपीएफ’चे प्रमुख अनीश दलाल यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरला पाठवले आहे.

मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी इम्फाळमध्ये निदर्शने केली. मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि राज्यपाल एल. पी. आचार्य यांचे पुतळे जाळले. तसेच लष्कर, आसाम रायफल्स, बीएसएफ, सीआरपीएफ, मणिपूर पोलीस व राज्याच्या कमांडोंनी इम्फाळ व बाहेरील परिसरात ध्वज संचलन केले.

अमित शहा यांनी घेतला स्थितीचा आढावा

मणिपूरच्या परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सलग दुसऱ्या दिवशी आढावा घेतला. राज्यात तत्काळ शांतता व कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश शहा यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड