एएनआय
राष्ट्रीय

झारखंडमध्ये ४३ मतदारसंघांत आज पहिल्या टप्प्याचे मतदान; वायनाडमध्येही मतदानाला सुरूवात

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात ४३ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रालोआ व इंडिया आघाडीत जोरदार चुरस सुरू आहे.

Swapnil S

रांची : झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात ४३ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रालोआ व इंडिया आघाडीत जोरदार चुरस सुरू आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २५ जागा जेएमएम-काँग्रेस-आरजेडी आघाडीने जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ १३ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत आपली कामगिरी सुधारण्यासाठी भाजप प्रचंड मेहनत घेत आहे, तर ‘इंडिया’ आघाडी आपली कामगिरी कायम ठेवून जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह झारखंडच्या सहा मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चंपाई सोरेन भाजपमध्ये गेले असून ते आपल्या परंपरागत सरायकेला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून ते ६ वेळा विधानसभेवर गेले आहेत. या निवडणुकीत भाजपने चंपाई सोरेन यांना प्रमुख चेहरा म्हणून उतरवले आहे.

१० राज्यांतील विधानसभेच्या३१ जागांसाठी पोटनिवडणूक

देशातील १० राज्यांतील ३१ विधानसभा व केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. वायनाडमधून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपतर्फे नव्या हरिदास आव्हान देत आहेत. ३१ विधानसभा मतदारसंघांतील २८ आमदार हे खासदार बनले आहेत, तर दोन आमदारांचे निधन झाले तसेच एका आमदाराने पक्ष बदलल्याने ही निवडणूक होत आहे. ३१ पैकी १८ जागा या विरोधकांनी जिंकल्या आहेत, त्यापैकी काँग्रेसने ९ जागा जिंकल्या होत्या, तर रालोआने ११ जागा जिंकल्या होत्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी