पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची केली घोषणा; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून केले निलंबित  (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची केली घोषणा; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून केले निलंबित

पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेस पक्षाचे मुर्शिदाबाद येथील आमदार हुमायूं कबीर यांना पक्षातून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. कबीर यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेस पक्षाचे मुर्शिदाबाद येथील आमदार हुमायूं कबीर यांना पक्षातून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. कबीर यांच्या या वक्तव्यानंतर पक्षाने त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार हुमायूं कबीर यांनी ६ डिसेंबर रोजी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. त्यांचे हे वक्तव्य पक्षविरोधी आणि वादाला जन्म देणारे ठरले. या घोषणेमुळे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची तीव्र नाराजी व्यक्त केली.

माजी महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फिरहाद हकीम यांनी आमदाराच्या निलंबनाची बातमी अधिकृतपणे जाहीर केली. मुर्शिदाबादच्या आमदाराने बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली. बाबरी मशीद कशासाठी, यापूर्वीही त्यांना ताकीद देण्यात आली होती, असे हकीम यांनी स्पष्ट केले.

IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

नाशिकच्या १८०० झाडांवर कुऱ्हाड? मनसेनंतर आदित्य ठाकरेंची एंट्री; भाजप-बिल्डर लॉबीवर घणाघात, "भाजपच्या बिल्डर मित्रांची...

Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबेडकरांना अभिवादन; "त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत...

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झाली सरवणकरांची सून; लग्नानंतर नवदाम्पत्य पोहचलं सिद्धिविनायक मंदिरात! पाहा खास Photos