सोने-चांदी महागणार? यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग? बघा लिस्ट Free Pic-ANI
राष्ट्रीय

सोने-चांदी महागणार? यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग? बघा लिस्ट

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 3.0 च्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस केला आहे.

Kkhushi Niramish

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकार 3.0 च्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस केला आहे. 2025-26 साठीच्या या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक वेगवेगळ्या वस्तूंवरील करात बदल करण्यात आले आहे. विशेष करून गरीब, मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. स्मार्ट फोन, इलेक्ट्रॉनिक व्हेईकल, जीवनावश्यक औषधे इत्यादी गोष्टी स्वस्त होणार आहे. तर प्रीमियम टीव्ही महागणार आहे. जाणून घेऊ यंदाच्या अर्थसंकल्पाने कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होणार आहेत.

व्यायसायिक सिलिंडर 7 रुपयांनी स्वस्त

अर्थसंकल्पापूर्वी तेल कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाचे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली. व्यावसायिक सिलिंडरचे दर सात रुपयांनी स्वस्त होणार आहेत.

या वस्तू होणार स्वस्त

कर्करोगासह अन्य गंभीर आजारांवरील वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील मूलभूत आयात शुल्कातून पूर्णपणे सूट दिली आहे. तसेच अन्य 6 जीवनावश्यक औषधांना आयात शुल्कातून सूट मिळाली आहे. त्यामुळे ही औषधे आता स्वस्त होणार आहेत.

ओपन सेल्स आणि कम्पोनेंट्स वरील आयात शुल्क हटवल्याने आता LCD आणि LED टीव्ही स्वस्त होणार आहे.

याशिवाय लिथियम आयन बॅट्री, इलेक्ट्रॉनिक व्हेईकल आणि मोबाईलच्या बॅट्री, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक कार, चामड्याच्या वस्तू, हातमागावरील कपडे, समुद्री उत्पाद, फ्रोजन फिश पेस्ट इत्यादी वस्तू स्वस्त होणार आहे.

या वस्तू होणार महाग

तर इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले पॅनल, प्रीमियम स्मार्ट डिस्प्ले प्रीमियम टीव्ही महाग होणार आहेत.

सोने-चांदी जैसे थे

गेल्या वर्षी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटीला 6 टक्क्यापर्यंत कमी केले होते. मात्र, या वर्षी यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोने-चांदी जैसे थे पोझिशनमध्ये राहणार

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती