(संग्रहित छायाचित्र) 
राष्ट्रीय

केजरीवालांना पुन्हा अटक होणार का? हायकोर्टाचा ईडीला सवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्यात आलेल्या जामिनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला, ‘तपास यंत्रणा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा अटक करू इच्छिते का?’, अशी विचारणा केली.

Swapnil S

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्यात आलेल्या जामिनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला, ‘तपास यंत्रणा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा अटक करू इच्छिते का?’, अशी विचारणा केली.

न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी हा प्रश्न विचारला व त्या म्हणाल्या की, ‘मी गोंधळले आहे. अखेर, तुम्हाला (ईडी) काय करायचे आहे?’ ईडीचे वकील विवेक गुरनानी यांनी न्यायालयाला सांगितले की, एएसजी एसव्ही राजू दुसऱ्या खटल्यात व्यस्त आहेत, त्यामुळे न्यायालयाने उद्या किंवा दुसऱ्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी करावी. केजरीवाल यांची बाजू मांडणारे अधिवक्ता विक्रम चौधरी म्हणाले की, हा निव्वळ छळवणुकीचा प्रकार आहे.

राऊस ॲव्हेन्यू कोर्टाचा केजरीवाल यांना जामीन

राऊस एव्हेन्यू कोर्टाने २० जूनला केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, २१ जून रोजी ईडीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर २५ जूनला सुनावणी झाली. त्यानंतर ईडीने हायकोर्टात सांगितले होते की, ट्रायल कोर्टाने आमची बाजू नीट ऐकून घेतली नाही. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने राऊस ॲव्हेन्यू कोर्टाचा निर्णय रद्द केला.

ईडीशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सीबीआयचा खटलाही सुरू आहे. दारू धोरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांना २६ जूनला अटक केली होती. १२ जुलैला सुप्रीम कोर्टाने ईडी प्रकरणात केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता, परंतु हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले होते. यावरील सुनावणीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ​​​​​

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा