राष्ट्रीय

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल की नाही ? निकाल राखून ठेवला

गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक न्यायालयांत समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी याचिका दाखल झाल्या आहेत

नवशक्ती Web Desk

समलैंगिक विवाहाबाबत सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने समान अधिकारांबाबत दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आपला निकाल राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. रवींद्र भट, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिम्हा यांचा या घटनापीठात समावेश आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक न्यायालयांत समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी याचिका दाखल झाल्या आहेत. १८ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने २० याचिकांची एकत्रित सुनावणी केली. विशेष विवाह कायदा, परदेशी विवाह कायदा, हिंदू विवाह कायद्यासहित विविध नियमांतर्गत समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल की नाही, हे न्यायालयच ठरवेल. तत्पूर्वीच त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. केंद्र सरकारसोबतच राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग व सामाजिक संघटनांनी याचा विरोध केला.

Mumbai : सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ मोठा अपघात; लोकलच्या धडकेत २ महिलांचा मृत्यू, २ जण जखमी

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन; कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल, १ तास लोकलसेवा विस्कळीत

ऑनलाइन बेटिंग प्रकरण : शिखर धवन आणि सुरेश रैनाला ED चा दणका; ११.१४ कोटींची मालमत्ता जप्त

बुलढाणा हादरले! दारूच्या नशेत मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, चौकशी समितीची स्थापना