राष्ट्रीय

Video : तरुणाने कापली अमित शाहंची पतंग, गृहमंत्र्यांची रिएक्शन झाली व्हायरल

गुजरातच्या सामान्य घरातील तरुणाने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची पतंग कापल्यामुळे या व्हिडिओखाली नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

Rakesh Mali

देशभरात मकर संक्रांतीचा सण सोमवारी उत्सवात साजरा केला गेला. हा सण वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात आपण ज्या सणाला मकर संक्राती म्हणतो, त्यालाच पंजाब आणि हरियाणामध्ये माघी किंवा लोहडी नावाने ओळखतात. तर, तामिळनाडूमध्ये पोंगल आणि उत्तर प्रदेशात मकर संक्राती आणि खिचडी या नावाने ओळखला जातो. या सणाला गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात. गुजरातमध्ये उत्तरायणाच्यानिमित्ताने पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते.

गुजरात पतंग महोत्सवात अनेक नेते पतंग उडवण्याचा आनंद घेतात. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या महोत्सवात पतंग उडवण्याचा आनंद लुटला. या दरम्यान घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक तरुण पतंग उडवताना दिसत आहे. यावेळी एका व्यक्तीची पतंग कापल्याने तो आनंदीत होतो. जेव्हा कॅमेरा दुसऱीकडे वळतो तेव्हा अमित शाह हे आपला मांजा गोळा करताना दिसतात. आपण केंद्रीय गृहमंत्र्यांची पतंग कापली म्हणून या मुलाच्या आनंदाला पारावर उरत नाही आणि तो मोठ्याने जल्लोष करतो. त्याला बघून अमित शाह यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटते आणि 'थम्ब्सअप' देत जणू तू जिंकलास असे ते त्याला सांगतात.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. गुजरातच्या सामान्य घरातील तरुणाने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची पतंग कापल्यामुळे या व्हिडिओखाली नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस