(Photo-X)
राष्ट्रीय

युमनाम खेमचंद सिंह होणार मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री; भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री असतील. मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून ते राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.

Swapnil S

नवी दिल्ली : भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री असतील. मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून ते राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.

मणिपूरच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी नियुक्त केलेले केंद्रीय निरीक्षक तरुण चुग, संबित पात्रा आणि मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बीरेन सिंह यावेळी उपस्थित होते.

मणिपूरमधून एनडीएचे सुमारे २० आमदार रविवारी रात्री दिल्लीत पोहोचले होते. तर इतर आमदार सोमवारी केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार राजधानीत पोहोचले होते.

९ फेब्रुवारी २०२५ रोजी बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या ४ दिवसांनंतर १३ फेब्रुवारी २०२५ पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रपती राजवट संपत आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये सरकार बनवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

भाजपने मणिपूर विधिमंडळ नेतेपदी यूमनाम खेमचंद सिंह यांची निवड केली, तर कुकी समाजातील महिला नेत्या नेमचा किपगेन यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन