सिंगापूर : आसामी गायक झुबिन गर्ग यांचा शवविच्छेदन अहवाल सिंगापूर पोलीस दलाने भारताच्या उच्चायुक्तालयाकडे सुपूर्द केला आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, शवविच्छेदनाचा अहवाल तसेच प्राथमिक तपासणीतून मिळालेली निष्कर्षांची प्रत भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार त्यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, नागरिकांना यासंदर्भातील कोणतेही व्हिडीओ किंवा छायाचित्रे शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आसाम पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी झुबिन गर्ग यांचे सहकलाकार शेखर ज्योती गोस्वामी आणि सहगायिका अमृतप्रावा महंता यांना अटक केली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे.
विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि विशेष डीजीपी (सीआयडी) मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, एसआयटी/सीआयडीकडून अनेक दिवस चाललेल्या चौकशीनंतर गोस्वामी आणि अमृतप्रावा महंता यांना रात्री अटक करण्यात आली.
यापूर्वी बुधवारी, आसाम पोलिसांच्या सीआयडी/एसआयटीने ईशान्य भारत महोत्सव सिंगापूरमध्ये आयोजित करणारे मुख्य आयोजक श्यामकानू महंता आणि झुबिन गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना अटक केली होती.
कामरूप (मेट्रो) जिल्ह्याच्या मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी श्यामकानू महंता आणि सिद्धार्थ शर्मा यांना १४ दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, सीआयडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेतील खुनाचे कलमही जोडले आहे.सिंगापूर : आसामी गायक झुबिन गर्ग यांचा शवविच्छेदन अहवाल सिंगापूर पोलीस दलाने भारताच्या उच्चायुक्तालयाकडे सुपूर्द केला आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, शवविच्छेदनाचा अहवाल तसेच प्राथमिक तपासणीतून मिळालेली निष्कर्षांची प्रत भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार त्यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, नागरिकांना यासंदर्भातील कोणतेही व्हिडीओ किंवा छायाचित्रे शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आसाम पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी झुबिन गर्ग यांचे सहकलाकार शेखर ज्योती गोस्वामी आणि सहगायिका अमृतप्रावा महंता यांना अटक केली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे.
विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि विशेष डीजीपी (सीआयडी) मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, एसआयटी/सीआयडीकडून अनेक दिवस चाललेल्या चौकशीनंतर गोस्वामी आणि अमृतप्रावा महंता यांना रात्री अटक करण्यात आली.
यापूर्वी बुधवारी, आसाम पोलिसांच्या सीआयडी/एसआयटीने ईशान्य भारत महोत्सव सिंगापूरमध्ये आयोजित करणारे मुख्य आयोजक श्यामकानू महंता आणि झुबिन गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना अटक केली होती.
कामरूप (मेट्रो) जिल्ह्याच्या मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी श्यामकानू महंता आणि सिद्धार्थ शर्मा यांना १४ दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, सीआयडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेतील खुनाचे कलमही जोडले आहे.
एनआयए तपासाची मागणी
ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानू महंता यांना गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून चौकशी हस्तांतरित करून सीबीआय किंवा एनआयएकडे सोपवावी, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे एका याचिकेद्वारे केली आहे.