नवी मुंबई

नवी मुंबईत १५ लाखांची वीजचोरी

महावितरणच्या भरारी पथकाने खांदा कॉलनी सेक्टर-११ मधील हॉटेलचालकाकडून होत असलेली तब्बल १५ लाख २३ हजार रुपयांची वीजचोरी पकडली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : महावितरणच्या भरारी पथकाने खांदा कॉलनी सेक्टर-११ मधील हॉटेलचालकाकडून होत असलेली तब्बल १५ लाख २३ हजार रुपयांची वीजचोरी पकडली आहे. सदर हॉटेलचालकाने विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून मागील चार वर्षापासून वीजचोरी करत असल्याचे महावितरणने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे महावितरणने या हॉटेलमालकाविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

खांदा कॉलनीतील सेक्टर-११ मधील मंगलमूर्ती टॉवर इमारतीतील गाळा नंबर ६ मध्ये हॉटेल फूड कॅस्टल लाऊंज येथे विजेची चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे महावितरणच्या भरारी पथकाने गत ४ नोव्हेंबर रोजी वीजचोरी होत असलेल्या हॉटेल फूड कॅस्टल लाऊंज येथे छापा मारला. त्यानंतर भरारी पथकाने मीटरची पाहणी केली असता, मीटर बॉडी व सील संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्यानंतर भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मीटर ब्रेक ओपन केले असता, मीटरमध्ये काळ्या रंगाचा रिमोट कंट्रोल सर्किटला जोडल्याचे दिसून आले.

यावरून सदर हॉटेलमध्ये विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने केलेल्या तपासणीत सदर हॉटेल चालवणाऱ्या सुशांत मंडलिकने मागील ४२ महिन्यांमध्ये ७१६९९ युनिट्सची तब्बल १५ लाख २३ हजार ५१० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे भरारी पथकाने सुशांत मंडलिकविरोधात खांदा कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास