File
File 
नवी मुंबई

नवी मुंबईत ८ महिन्यात अवैध वाहतूक करणाऱ्या १४७ वाहनांवर कारवाई

देवांग भागवत

नवी मुंबई वाहतूक विभागाकडून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. सायन पनवेल महामार्गावरील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना यावेळी विशेष लक्ष्य करण्यात आले आहे. वाहन परवाना नसणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी नेणे इत्यादी अवैध वाहतूकीच्या आणि त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. परिणामी नवी मुंबई वाहतूक विभागाकडून एप्रिलपासून आतापर्यंत अवैध वाहतूक करणाऱ्या १४७ गाड्यांवर कारवाई करून १५ लाखांहून अधिक दंडात्मक वसुली करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई शहर सुटसुटीत शहर म्हणून ओळखले जाते. मात्र रस्त्यांवर धावताना वाहनचालकांकडून अवैध प्रवासी वाहतूक, अवैध माल वाहतूक सुरूच असते. त्यावर परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरी देखील शहरात आजही अवैध वाहतूक केली जात आहे. यामध्ये वाहतुकीचा परवाना नसणे , योग्यता प्रमाणपत्र नसणे अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. एखाद्या मालाची वाहतूक कारायची असेल मालवाहतूक व्यासायिक वाहनाने करावी लागते. तर अनेकदा काही खासगी वाहने अल्प दरात प्रवासी वाहतुकीबरोबर व्यसायिक मालवाहतुक करताना दिसत असतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने एप्रिलपासून आतापर्यंत एकूण १४७ वाहनांवर कारवाई करत १५ लाख २० हजार ६०७ रुपये दंडात्मक वसुली केली आहे.

वारंवार कारवाई करूनही अद्याप बेशिस्त वाहतूक सुरु आहे. अवैध वाहतूक करण्याऱ्या चालकांवर वचक बसावा यासाठी वाहनांवर कारवाई सुरु आहे. यापुढे ही अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.

- हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, नवी मुंबई आरटीओ

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप