नवी मुंबई

'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान

प्रतिनिधी

पद्मश्रीने सन्मानित ज्येष्ठ निरुपणकार डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. तसेच, खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावरील या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायांनी हजेरी लावली होती.

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री, डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आप्पासाहेब धर्माधिकारींच्या रेवदंडामधील निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. ते गेली ३० वर्ष निरूपण करत असून अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आहेत. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही त्यांनी केलेले आहे.

तसेच, २००८मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यामुळे एकाच घरात २ महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केल्याची ही पहिलीच वेळ. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. या संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले असून वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर