नवी मुंबई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

खारघर भागात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : खारघर भागात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर या तरुणाने तिला मारहाण करून व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवून भररस्त्यात प्रेग्नेंट करण्याची धमकी दिली. अक्षत सोनावणे (२०) असे या तरुणाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी अक्षत सोनावणे व पीडित तरुणी हे दोघेही खारघरमध्ये राहण्यास आहेत. २०२० मध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असताना आरोपी अक्षत याने तिच्यासोबत मैत्री केली होती. त्यानंतर त्याने तिच्याकडे वारंवार शारीरिक संबध ठेवण्याची मागणी केली.

पीडित मुलीने त्याला नकार दिल्यानंतर देखील आरोपी अक्षतने तिच्यासोबत २ वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मात्र त्यानंतर देखील पीडित मुलीने त्याच्यासोबत कायम शरीरसंबंध ठेवावेत, यासाठी आरोपी अक्षतने तगादा लावला.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य