नवी मुंबई

कामाला गती येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी ; अधिसुचना जारी

२७ ऑगस्ट २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या काळासाठी ही बंदी असणार आहे. या काळात अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवलं जाणार आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई-गोवा महामार्गाच्या(Mumbai-Goa highway) कामाला गती यावी यासाठी आजपासून (२७ऑगस्ट) गणेशोत्वर संपेपर्यंत या महामार्गावरील अवजड वाहतूक(heavy vehicles ) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून(Trafic Police) याबाबतची अधिसुचना( Notification) जारी करण्यात आली आहे. जिवनावश्क वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सुट देण्यात आली आहे.

सध्या मुंबई-गोवा महामार्ग हा चर्चेचा विषय बनला आहे. कित्येक वर्षापासून हा या महामार्गाचे काम सुरु असून आता स्थानिकांच्या भावनेचा उद्रेक होताना दिसत आहे. या महामार्गाच्या कामाला गती येण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गाचं काम सध्या जोरात सुरु असल्याने एका बाजूनं वाहतूक सुरु आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन कामात अडथळा येतो. त्यात गणशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्य जास्त असते. त्यांच्या प्रवास सुरक्षित व्हावा, अशा हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या महामार्गावर १६ टनापेक्षा जास्त क्षमता असलेले ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर यांना बंधी असणार आहे. २७ ऑगस्ट(आजपासून) २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या काळासाठी ही बंदी असणार आहे. या काळात अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवलं जाणार आहे. पोलीस उप आयुक्त वाहतूक रिरुपती काकडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पळस्पे फाटा येथून कोन फाटा येथून मुंबई-पुणे दृतगती मार्गाचा वापर करुन खालापूर येथून पाली वाकणमार्गे अवजड वाहनांना वळविण्यात येणार आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video