नवी मुंबई

मारहाण करणाऱ्या ट्रकचालकांना पोलीस कोठडी

Swapnil S

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या ट्रकचालकांनी पोलिसांवरच हल्ला केला होता. याप्रकरणी ३३ आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींना न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी फर्मविली आहे. जेएनपीटी मार्गावर ट्रकचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांना अटकाव करणाऱ्या पोलिसांवरच काही ट्रकचालकांनी हल्ला केला. यात दगडफेक करत काठ्यांनी मारहाण केली. यात चार पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी ५० दंगलखोरांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्यातील ३३ जणांचा हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच