नवी मुंबई

चेन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंचा धुडगूस, आठवड्याभरात तिसरी घटना

चेन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी सोमवारी रात्री शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केल्याची घटना घडली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : चेन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी सोमवारी रात्री शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केल्याची घटना घडली आहे. रबाळे पोलिसांनी या लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, चेन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी ऐरोली भागात मागील आठवड्याभरात केलेली ही तिसरी चेन स्नॅचिंगची घटना आहे. गत आठवड्यात या लुटारूंनी दोन महिला शिक्षकांच्या अंगावरील दागिने लुटून नेले होते.

या प्रकरणातील तक्रारदार सिंधु मोरे (५४) या ऐरोली सेक्टर-५ मध्ये कुटुंबासह राहण्यास आहेत. सिंधु मोरे या आपल्या चाळीतील महिलांसोबत दररोज रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शतपावली करण्यासाठी जात असतात. सोमवारी रात्री ११ वाजता सिंधु मोरे या चाळीतील महिलांसोबत ऐरोली सेक्टर-५ मधील पंचवटी अपार्टमेंटच्या समोरील रोडवर शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने सिंधु मोरे यांच्या पाठीवर जोरात थाप मारून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून भरधाव वेगात पलायन केले. या प्रकारानंतर सर्व महिलांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत दोघे लुटारू दिसेनासे झाले. त्यानंतर या सर्व महिलांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video