नवी मुंबई

सीवूड्स मॉलमध्ये पुष्पा-२ चित्रपटादरम्यान राडा; माजी नगरसेवकाला मारहाण, थिएटर मॅनेजरसह सहा जणांवर गुन्हा

पुष्पा-२ चित्रपट पाहण्यासाठी गेलेले नेरूळमधील माजी नगरसेवक व इतर चार तरुणांमध्ये वादावादी झाल्याने सदर तरुणांनी माजी नगरसेवक व त्याच्या पुतण्याला मारहाण केल्याची घटना सीवूड्स मॉलमध्ये घडली.

Swapnil S

नवी मुंबई : पुष्पा-२ चित्रपट पाहण्यासाठी गेलेले नेरूळमधील माजी नगरसेवक व इतर चार तरुणांमध्ये वादावादी झाल्याने सदर तरुणांनी माजी नगरसेवक व त्याच्या पुतण्याला मारहाण केल्याची घटना सीवूड्स मॉलमध्ये घडली. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तीन तरुणांसह थिएटरचा मॅनेजर, सुपरवायझर आणि सुरक्षारक्षक अशा एकूण ६ जणांविरोधात मारहाणीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

नेरूळमधील माजी नगरसेवक गत शनिवारी रात्री सीवूड्स मॉलमध्ये आपल्या कुटुंबासह पुष्पा-२ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी तीन तरुण अश्लील शेरेबाजी करत असल्याने माजी नगरसेवकाने सदर तरुणांना हटकले. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद वाढल्याने ते सर्व थिएटरच्या बाहेर आले. यावेळी त्यांच्यामधील वाद वाढल्यानंतर तिन्ही तरुणांनी नगरसेवकासोबत हुज्जत घालून थिएटरचा मॅनेजर, सुरपवायझर व सुरक्षारक्षक यांच्यासमोर नगरसेवकाला धक्काबुक्की करून मारहाण केली. यावेळी सदर तरुणांनी नगरसेवकाच्या पुतण्याला देखील धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.

यावेळी थिएटरचा मॅनेजर, सुपरवायझर आणि सुरक्षारक्षकाने मारहाण करणाऱ्या तरुणांना न अडवता फक्त बघ्याची भूमिका घेतली. या मारहाणीत नगरसेवक किरकोळ जखमी झाल्याने त्यांनी एनआरआय पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणारे तरुण इजहार शेख, वाजिद आलम, साजिद आलम तसेच थिएटरचा मॅनेजर अब्बास शेख, सुपरवायजर प्रकाश ठुकरुल व सुरक्षारक्षक शुभम खोपडे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त