नवी मुंबई विमानतळ ते दादर असा थेट प्रवास एसटीने जोडला जाणार आहे. त्यासाठी बुधवारी परिवहन विभागाने ई शिवाई ही बससेवा सुरू केली.  (छायाचित्र : विजय गोहिल)
नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळ ते दादर थेट एसटी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)वतीने दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा सुरू करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)वतीने दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा सुरू करण्यात आली. ही बस अटल सेतू मार्गांवरून धावणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. विमानतळ उभारणीइतकेच महत्त्वाचे म्हणजे त्याला मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण तसेच राज्याच्या विविध भागांशी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडणे होय. या पार्श्वभूमीवर, एसटीची दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबरोबरच बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी बससेवादेखील सुरू होत आहे.

नवी मुंबई विमानतळ ते दादर असा थेट प्रवास एसटीने जोडला जाणार आहे. त्यासाठी बुधवारी परिवहन विभागाने ई शिवाई ही बससेवा सुरू केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटीची विमानतळ बससेवा महत्त्वपूर्ण ठरेल. विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच विमानप्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह, प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. एसटीची ‘लालपरी’ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.

नवी मुंबई विमानतळ ते दादर असा थेट प्रवास एसटीने जोडला जाणार आहे. त्यासाठी बुधवारी परिवहन विभागाने ई शिवाई ही बससेवा सुरू केली.

या व्यापक जाळ्याचा उपयोग करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना सहज आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथून विमानतळासाठी सुरू होणारी थेट बससेवा प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. त्यामुळे माफक खर्चात प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावरून थेट मुंबईत प्रवेश करता येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

महागाई आणखी वाढणार; चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार

पुणे-नांदेडमधील 'महाज्योती' व 'वनार्टी'ची परीक्षा ऐनवेळी रद्द; केंद्रावर तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप

...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत