मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले आहे. महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला आहे.
मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले आहे. महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला आहे.  
नवी मुंबई

सागरी सेतू व नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई व दक्षिण नवी मुंबईचा होणार मिलाफ

Swapnil S

नवी मुंबई : मुंबईला थेट दक्षिण नवी मुंबईचे टोक असलेल्या उरण शहराशी जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर १२ जानेवारीपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या नेरुळ ते खारकोपरपर्यंत धावणारी उपनगरी लोकल आता थेट उरणपर्यंत धावणार असल्याने सिडको अंतर्गत दक्षिण नवी मुंबईच्या विकासाच्या इंजिनाने वेग पकडला आहे.

तर दुसरीकडे शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक हा अति भव्यदिव्य सागरी मार्ग देखील दळणवळणासाठी खुला झाला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई व दक्षिण नवी मुंबईत थेट कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. परिणामी, दक्षिण नवी मुंबईतील उरण-द्रोणागिरी परिसरासह नव्याने निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या परिसरात गुंतवणुकीचे सर्वात मोठे केंद्र निर्माण होणार आहे. सी-लिंकमुळे आणि जेएनपीटी परिसरात निर्माण झालेल्या सर्व्हिस इंडस्ट्री व लॉजिस्टिक हबमुळे प्रॉपर्टीसाठी दक्षिण नवी मुंबई सर्वात हॉट डेस्टीनेशन ठरणार आहे.

न्हावा-शिवडी सी-लिंक व उरण रेल्वे प्रकल्पामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांचा वाढता लोंढा हा मुंबई उपनगरात किंवा वसई-विरारला न जाता तो आता दक्षिण नवी मुंबईतील द्रोणागिरीकडे वळल्यास आश्चर्य वाटू नये. त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व नैना प्रकल्पासह जेएनपीटी पोर्टचा चौपटीने विकास होत असल्यामुळे सिडकोच्या द्रोणागिरी नोडला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात सिडकोद्वारे साऊथ नवी मुंबईत देखील परवडणाऱ्या घराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

एकंदरीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-जेएनपीटी फ्रेट कॉरिडॉर, विरार-वसई-अलिबाग कॉरिडॉर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, मुंबई-पुणे-नाशिक आदी रिंगरुट कनेक्टिव्हिटी प्रकल्प दक्षिण नवी मुंबईसह तिसरी मुंबईच्या विकासाला चालना देणारे ठरत आहेत.

नवी मुंबईसारखे सुनियोजित शहर, दळणवळणाच्या सोयीसुविधा, मेट्रो व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प तसेच नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पामुळे दक्षिण नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिडकोने उभारलेल्या नवी मुंबई क्षेत्रात सर्वात जास्त ६२ सेक्टर्स हे द्रोणागिरी नोडमध्ये विकसित केले जाणार आहेत.

- अनिल डिग्गीकर (व्यवस्थापकीय संचालक सिडको)

कोकणात जाण्यासाठी एमटीएचएल सर्वोत्तम पर्याय

याशिवाय उरण परिसरात असलेल्या जेएनपीटी बंदरामुळे या ठिकाणी सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच कार्गो गोडाऊन्स मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. ओएनजीसीसह अन्य मोठ्या कंपन्या येथे कार्यरत आहेत. द्रोणागिरी येथूनच चिरनेर मार्गे मुंबई-गोवा हायवेला कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. त्यामुळे साऊथ मुंबईहून पुण्यासह कोकणात किंवा गोव्याला जाण्यासाठी व्हाया एमटीएचएल हा मार्ग सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. न्हावा-शिवडी सी-लिंकमुळे दक्षिण नवी मुंबई व दक्षिण मुंबई काही मिनिटांच्या अंतरावर येणार आहेत.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार