नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी 
नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची खोटी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. २४ जून रोजी विमानतळाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची खोटी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. २४ जून रोजी विमानतळाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता.

तांत्रिक आणि सायबर तपासात आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी तमिळनाडूतील एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आणि बनावट ई-मेल आयडीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २९ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वी २५ जून रोजी रासायनिक बॉम्बची, तर २९ जून रोजी सोशल मीडियावरून विमानतळ उडवून देण्याची आणि विमान अपहरणाची धमकी देण्यात आली होती.

प्रत्येक वेळी सुरक्षा यंत्रणा, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने सखोल तपासणी केली; मात्र सर्व धमक्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली