Navi Mumbai : सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून डॉक्टरांना दीड कोटींचा गंडा 
नवी मुंबई

Navi Mumbai : सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून डॉक्टरांना दीड कोटींचा गंडा

कस्टम विभागात अधिकारी असल्याची बतावणी करुन कस्टमकडून जप्त केलेले सोने बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या माधवी किशोर ढेंबे ऊर्फ सान्वी सुहास चव्हाण हिच्या फसवणुकीचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : कस्टम विभागात अधिकारी असल्याची बतावणी करुन कस्टमकडून जप्त केलेले सोने बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या माधवी किशोर ढेंबे ऊर्फ सान्वी सुहास चव्हाण हिच्या फसवणुकीचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. माधवी ढेंबे हिने नवी मुंबईतील तीन तरुण डॉक्टरांना सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून त्यांना तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

परतावा देण्यास टाळाटाळ

माधवीने या डॉक्टर्सना सुरुवातीला काही परतावा दिला, मात्र नंतर तिने परतावा देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर या डॉक्टर्सने माधवीची माहिती काढली असता तिने या आधीही केलेले कारनामे त्यांना समजले. त्यानंतर या डॉक्टर्सने थेट पोलीस आयुक्तांकडे थेट निवेदन सादर करुन माधवी ढेंबे हिच्यावर आपली रक्कम परत मिळवून देण्यासाठी तसेच संबंधित महिलेविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...