नवी मुंबई

जेईई मेन परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी

Swapnil S

पनवेल : देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी परीक्षा असलेल्या जेईई (JEE) मेन २०२४ परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सुवर्ण कामगिरी केली आहे. या विद्यालयातील अक्षत डागा या विद्यार्थ्याने तब्बल ९९.९४ टक्के गुण प्राप्त करत नवी मुंबईत टॉपर होण्याचा सन्मान मिळविला आहे. ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत आणि त्यामधील सहा विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जेईई मेन २०२४ या परीक्षेचा जानेवारी सत्राचा निकाल जाहीर केला आहे. विद्यालयातील अक्षत डागा या विद्यार्थ्याने तब्बल ९९.९४ टक्के गुण मिळवून नवी मुंबईत टॉपर होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तसेच हर्षिता जारोंडेने ९९.७० टक्के, अनय श्रीवास्तव ९९.५२ टक्के, पहिलप्रित कौर ९९.२२ टक्के, विनायक भद्र ९९.२१ टक्के, तर रुपेश महापत्राने ९९.०५ टक्के गुण मिळवत ९९ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले.

हर्षित कांडपाल ९८.२४ टक्के, अनिश महापत्रा ९७.१३ टक्के, देवांश पाटील ९६.६९ टक्के, गौरंग सेलोकर ९६.५५ टक्के, दिव्यांनी गुल्हाने ९६.२४ टक्के, अथर्व कुलकर्णी ९५.५२ टक्के, प्रियांश गुप्ता ९५.३२ टक्के, इस्माईल नाईक ९४.६१ टक्के, अद्रिता काकोटी ९३.५० टक्के गुण प्राप्त केले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल