नवी मुंबई

Navi Mumbai : गूगल मॅपने दाखवला चुकीचा रस्ता; महिला कारसकट पडली थेट खाडीत|Video

नेव्हिगेशन अ‍ॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे नवी मुंबईत एक थरारक घटना घडली. उलवे येथे एका महिलेला गूगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्याने तिची कार थेट खाडीत कोसळली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

नेहा जाधव - तांबे

नेव्हिगेशन अ‍ॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे नवी मुंबईत एक थरारक घटना घडली. उलवे येथे एका महिलेला गूगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्याने तिची कार थेट खाडीत कोसळली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ही धक्कादायक घटना शुक्रवारी (२५ जुलै) रात्री नवी मुंबईत घडली. ही महिला रात्री एकच्या सुमारास बेलापूरहून उलवेकडे प्रवास करत होती. रस्ता माहीत नसल्याने तिने नेव्हिगेशन अ‍ॅपची मदत घेतली. या अ‍ॅपने दाखवलेल्या मार्गावर ती गाडी चालवत होती. मात्र, अ‍ॅपने तिला पुलावरून नेण्याऐवजी पुलाखालील रस्त्याकडे वळवले. महिलेनं अ‍ॅपवरील मार्गावर विश्वास ठेवत गाडी पुढे नेली आणि अचानक कार थेट खाडीत कोसळली.

सुदैवाने, जवळच तैनात असलेल्या मरीन सिक्युरिटी फोर्सच्या कर्मचाऱ्यांच्या ही घटना वेळीच लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महिला त्यांना पाण्यात तरंगताना दिसली. या अपघातात महिलेला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. तिला सुखरूप घरी पाठवण्यात आले.

पाहा व्हिडिओ -

नाल्यात अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे; ज्यामध्ये क्रेनच्या मदतीने नुकसान झालेले वाहन खाडीतून बाहेर काढले जात असल्याचे दिसून येत आहे.

ही घटना नेव्हिगेशन अ‍ॅप्सवर अंधविश्वास ठेवण्याचे दुष्परिणाम अधोरेखित करते. तांत्रिक सुविधांचा उपयोग करताना व्यक्तीने स्वतःही जागरूक राहणे आणि प्रत्येक सूचना डोळसपणे तपासणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून समोर आले आहे.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास