नवी मुंबई

हिट ॲण्ड रन कायद्यामुळे वाहनचालक भयभीत;रस्त्यावर वाहतूककोंडी

Swapnil S

उरण: रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रकचालक व मालकांनी विरोध दर्शवत सोमवारी नवी मुंबई परिसरातील रस्त्यावर ठिय्या केला. जेएनपीए बंदरातील हजारो वाहनचालक हे सदर कायद्यामुळे भयभीत झाले असून सदर कायदा हा रद्द करावा या आपल्या मागणीसाठी बहुतांश चालकांनी आपली वाहने जागेवरवरच उभी करून घरात राहणे जास्त पसंत केले. एकंदरीत बंदर, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. रस्ते अपघातात ज्या गाडीने धडक मारली, त्यातील लोकांनी अपघातग्रस्तास मदत केली नाही तर त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल असा कायदा करण्यात आला आहे.

या कायद्याविरोधात ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी नवी मुंबई परिसरातील वर्दळीचे मार्ग रोखून आंदोलन छेडले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या कायद्यामुळे धास्तावलेल्या जेएनपीए बंदर परिसरातील हजारो वाहनचालकांनी हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी आपआपली वाहने जेएनपीए परिसरातील रस्त्यांवर उभी करून आपला निषेध नोंदविला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस