प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार 
नवी मुंबई

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

अदानी प्लॅटफॉर्मवरून ड्युटी-फ्री वस्तू खरेदी केल्यास प्रत्येक १०० रुपयांमागे ५ BluChips मिळवू शकणार आहेत. यामुळे प्रवाशांना शॉपिंगसोबतच अतिरिक्त लाभही मिळणार आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

लो-कॉस्ट एअरलाइन इंडिगोने रविवारी (दि.२९) मोठी घोषणा करत २९ मार्च ते २३ एप्रिलदरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३० हून अधिक नवीन फ्लाइट मार्ग सुरू करणार असल्याचे जाहीर केले.

देशातील अनेक शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी

या नवीन मार्गांमुळे आग्रा, अयोध्या, बागडोगरा, बेळगाव, चंदीगड, दीव, कन्नूर, कोलकाता, पाटणा, राजकोट, श्रीनगर, वाराणसी, विशाखापट्टणम यांसारख्या शहरांशी थेट संपर्क साधला जाणार आहे.

आठवड्याला ४०० हून अधिक उड्डाणे

या विस्तारानंतर इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून दर आठवड्याला ४०० हून अधिक उड्डाणे चालवणार असून, प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवास पर्याय उपलब्ध होणार आहेत.

अदानी समूहाकडून विकसित विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) या अदानी एंटरप्रायझेसच्या उपकंपनीने विकसित केले आहे. हा देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक असून कमी वेळेत पूर्ण झाला आहे.

भावनगर-नवी मुंबई थेट फ्लाइट सुरू

रविवारपासून इंडिगोने भावनगर आणि नवी मुंबई दरम्यान दररोज दोन थेट उड्डाणे सुरू केली आहेत. गुजरातमधील कनेक्टिव्हिटी यामुळे आणखी मजबूत होणार आहे. या मार्गावर इंडिगोचे ATR विमान वापरले जात असून प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

गुजरातमध्ये वाढलेले नेटवर्क

याआधीच इंडिगोने २३ एप्रिलपासून जामनगरसाठी थेट फ्लाइट सुरू करण्याची घोषणा केली होती. या नव्या सेवांमुळे इंडिगो आता गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सूरत, राजकोट, भावनगर आणि जामनगर अशा सहा शहरांमध्ये सेवा देणार आहे. या राज्यात आठवड्याला १४०० हून अधिक उड्डाणे चालवली जाणार आहेत.

इंडिगो-ब्लूचिप आणि अदानीची भागीदारी

इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट्सने भागीदारी करत BluChip (IndiGo कडून दिले जाणारे रिवार्ड पॉइंट्स) सदस्यांसाठी नवा फायदा जाहीर केला आहे. या अंतर्गत, अदानी प्लॅटफॉर्मवरून ड्युटी-फ्री वस्तू खरेदी केल्यास प्रत्येक १०० रुपयांमागे ५ BluChips मिळवू शकणार आहेत. यामुळे प्रवाशांना शॉपिंगसोबतच अतिरिक्त लाभही मिळणार आहेत.

ऑनलाइन शॉपिंगची सोय

प्रवासी प्रवासापूर्वी ऑनलाइन प्रॉडक्ट पाहू शकतात. तसेच बुक करून पेमेंट करून विमानतळावर सहजपणे वस्तू घेऊ शकतात. या सुविधेमुळे शॉपिंग अधिक सोपे आणि जलद होणार आहे.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया