प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

‘जेएनपीए’ची ई-स्पीड बोटसेवा तांत्रिकदृष्ट्या लांबणीवर

जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यान इलेक्ट्रीक लाँच सुरू करण्यात येणार होती, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा लांबणीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

Swapnil S

उरण : जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यान इलेक्ट्रीक लाँच सुरू करण्यात येणार होती, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा लांबणीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या आठवड्याभरात ही सेवा प्रात्यक्षिक घेऊन सुरू करण्यात येण्याची शक्यता जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. या लाँचमुळे तासाभराचा हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत वातानुकूलित ई-स्पीड बोटीमधून करता येणार आहे. त्यामुळे उरणकरांना गारेगार प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे.

या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत. जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ या मार्गावरील लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला. या लाँचचे उदघाटन केंद्रीय बंदर विभाग मंत्र्यांनी केले होते. या प्रदूषण विरहित स्पीडबोटीमुळे जेएनपीए-मुंबई दरम्यानचा प्रवास २५ मिनिटात होणार आहे. या सागरी मार्गाने जेएनपीएचे कामगार, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ, पोर्ट युजर्स आदी कामगार प्रवास करतात. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरून बोटी सुरू असतात.

जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याजागी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारला आहे.

येत्या आठवड्याभरात प्रात्यक्षिक सेवा

प्रदूषण विरहित, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये-जा करण्यासाठी स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षाभरापूर्वीच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र तांत्रिक कारणाने ही सेवा लांबली आहे. मात्र येत्या आठवड्याभरात ही सेवा प्रात्यक्षिक घेऊन सुरू करण्यात येईल, अशी माहिती जेएनपीएचे उप संरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.

२५ मिनिटांसाठी अधिकचे दर

जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ या मार्गावरील लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला. काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा लांबणीवर पडली होती. तासाभराचा हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत वातानुकूलित ई-स्पीड बोटमधून करता येणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत.

जातवर्गीय शिक्षण वास्तव

आजचा महाराष्ट्र ड्रग माफियांच्या सावलीत

आजचे राशिभविष्य, २२ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर; कोणत्या जिल्ह्यात कोण अव्वल?

निवडणुकांच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "हा तर महापालिका निवडणुकांचा ट्रेलर...