उरण : जेएनपीटीतील लॉजिस्टिक नेटवर्कला मोठा फटका; डीआरटी-सीएफएसचा परवाना निलंबित 
नवी मुंबई

उरण : जेएनपीटीतील लॉजिस्टिक नेटवर्कला मोठा फटका; डीआरटी-सीएफएसचा परवाना निलंबित

जवाहरलाल नेहरू पोर्ट परिसरातील सुरक्षेतील त्रुटी आणि चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत सीमाशुल्क विभागाने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (कॉन्कोर)च्या द्रोणागिरी येथील रेल्वे-लिंक्ड कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस)ची मान्यता तात्काळ प्रभावाने निलंबित केली आहे.

Swapnil S

उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट परिसरातील सुरक्षेतील त्रुटी आणि चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत सीमाशुल्क विभागाने कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (कॉन्कोर)च्या द्रोणागिरी येथील रेल्वे-लिंक्ड कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस)ची मान्यता तात्काळ प्रभावाने निलंबित केली आहे. या निर्णयामुळे आधीच मध्यपूर्वेतील संघर्षामुळे प्रभावित झालेल्या देशातील प्रमुख कंटेनर गेटवेच्या लॉजिस्टिक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

सुमारे ५९ एकर क्षेत्रात पसरलेल्या द्रोणागिरी रेल टर्मिनलची दरमहा सुमारे १४ हजार टीयूई कंटेनर हाताळण्याची क्षमता आहे. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसने यापूर्वी सर्व सेवा प्रदात्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कॉन्कोरच्या द्रोणागिरी सीएफएसमध्ये सुरक्षेतील गंभीर त्रुटी तसेच निर्यात मालाची चोरी किंवा अफरातफर झाल्याचे तपासात आढळून आले.

वाहतूककोंडीची शक्यता

दोन महिन्यांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत चिनी फटाक्यांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आल्यानंतर ग्लोबिकॉन सीएफएसची मान्यताही निलंबित करण्यात आली होती. या दोन्ही सुविधा बंद झाल्याने जेएनपीटी परिसरातील दरमहा सुमारे ३० हजार टीयूई कंटेनर हाताळणी क्षमतेवर परिणाम झाला आहे. कॉन्कोरच्या सीएफएसची महिन्याला ९० ते १०० रेल्वे रॅक हाताळण्याची क्षमता असून, ३५ हजार ६४० चौरस मीटरचे वेअरहाऊस क्षेत्र आहे. त्यामुळे बंदर परिसरातील कंटेनर वाहतुकीवर मोठा ताण येऊन वाहतूककोंडी आणि लॉजिस्टिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट

मध्य रेल्वेवर दररोज ११ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी