नवी मुंबई

अटल सेतूवरून प्रवास करताय? आज रात्री ११ ते रविवारी दु. १ पर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद

अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद

Swapnil S

नवी मुंबई : नुकताच उद्घाटन झालेल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर (एमटीएचएल) एमएमआरडीए विभागाकडून रविवार, दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसेच अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पार्यायी मार्गावरून जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

पुण्याहून अटल सेतू मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गाने बेलापूर, वाशीमार्ग पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच जुना मुंबई-पुणे हायवे, कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेलकडून येणाऱ्या वाहनांना देखील गव्हाण फाटा उरणफाटा वाशीमार्गे पुढे इच्छित जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटीकडून मुंबईसाठी जाणाऱ्या हलक्या वाहनांना गव्हाण फाटामार्गे उलवे आम्रमार्गे वाशी खाडी पूलमार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील तसेच मॅरेथॉनमधील वाहनांना वगळण्यात आले आहे.

वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्ग निश्चित

एमएमआरडीए विभागाकडून अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ ते दुपारी १२ या कालावधीत होणाऱ्या मॅरेथॉनला कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, तसेच मॅरेथॉन कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा, यासाठी अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर दोन दिवस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. तसेच अटल सेतू बंद असलेल्या कालावधीत उरणकडून अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशी मार्गे पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन