नवी मुंबई

वानरांनी धावत्या गाडीवर उडी मारली, भयभीत चालकासह चौघेजण थेट तलावात, अपघातात माकड ठार

उरण व पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील वन तसेच मालकीच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल, मातीचे उत्खनन सुरू आहे.

Swapnil S

उरण : दिघाटी - चिरनेर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या चारचाकी गाडीवर दबा धरून बसलेल्या वानरांनी गाडीवर उड्या मारल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सत्रात इंद्रायणी वळण रस्त्यावर घडली आहे. या अपघातात भयभीत झालेल्या चारचाकी गाडीतील चालकांनी व दोन पदचाऱ्यानी त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूच्या तलावात उड्या मारल्याने ते बचावले आहेत; मात्र या अपघातात वानर दगावला आहे.

उरण व पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील वन तसेच मालकीच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल, मातीचे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे भयभीत झालेले वन्यप्राणी हे पाण्याच्या व अन्नाच्या शोधात गाव वस्तीत ये- जा करत आहेत. त्यात केळवणे, दिघाटी, कळंबुसरे, चिरनेर गावातील रहिवाशांच्या घरावर वानर हे हैदोस घालताना दिसत आहेत. दिघाटी-चिरनेर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या फोर व्हीलर गाडीवर शुक्रवारी दबा धरून बसलेल्या वानरांनी उड्या मारल्याने भयभीत झालेल्या वाहन चालकांचा ताबा गाडीवरून सुटला, आणि सदर गाडी ही रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात कोसळणार तोच वाहनचालकाने व सहकाऱ्यांनी रस्त्याजवळील तलावात उड्या मारल्या. तर दोन रस्त्यावरून चाललेल्या व्यक्तींनी तलावात उड्या मारल्या. सुदैवाने ते बचावले आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश