नवी मुंबई

मोरा-भाऊचा धक्का लाँच बंद राहणार

उरणची जीवनवाहिनी बनलेली लाँच सेवा सागरी मार्गातील गाळ काढण्याच्या कामासाठी दररोज दोन ते तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मोरा बंदरालगतचा गाळ काढण्याचे काम सहा दिवस होणार आहे.

Swapnil S

उरण : उरणची जीवनवाहिनी बनलेली लाँच सेवा सागरी मार्गातील गाळ काढण्याच्या कामासाठी दररोज दोन ते तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मोरा बंदरालगतचा गाळ काढण्याचे काम सहा दिवस होणार आहे.

उरण ते मुंबई दरम्यान सुरू असलेली लाँचसेवा ही उरणच्या रहिवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. परंतु, समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे या मार्गावरील मोरा बंदरालगत सातत्याने गाळ जमा होतो. परिणामी लाँच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे, ओहोटीच्या वेळेस लाँचसेवा तीन ते चार तास बंद ठेवावी लागते.

२९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान मोरा जेट्टीलगतचा गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. या दिवसांत दुपारी सुमारे दोन ते तीन तास लाँचसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लोकलसेवेमुळे लाँचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक