नवी मुंबई

Navi Mumbai : नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

सीबीडी-बेलापूर भागात राहणाऱ्या एका तरुणाने शेजारी राहण्यासाठी आलेल्या एका नवविवाहितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

Swapnil S

नवी मुंबई : सीबीडी-बेलापूर भागात राहणाऱ्या एका तरुणाने शेजारी राहण्यासाठी आलेल्या एका नवविवाहितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. शिवा गोपाल चौहान (२५) असे या आरोपीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या घटनेतील आरोपी शिवा चौहाण हा बेलापूरमध्ये राहण्यास असून तो इलेक्ट्रिशियन काम करतो. तर २१ वर्षीय पीडित विवाहिता आरोपीच्या शेजारी राहण्यास असून तिचे नुकतेच लग्न झाले आहे. लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच ती बेलापूर राहण्यास आली होती. बुधवारी पीडित नवविवाहिता आपल्या घरामध्ये साफसफाईचे काम करत असताना, आरोपी शिवाने तिला काम असल्याचे सांगून आपल्या घरामध्ये बोलावून घेतले.

आरोपी शिवाने पीडित विवाहितेला जबरदस्तीने आपल्या घरामध्ये खेचून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर पीडित नवविवाहितेने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या पतीला दिल्यानंतर तिने एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एनआरआय पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन आरोपी शिवा चौहाणविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक केली आहे.

समृद्वी महामार्गावरून प्रवास करताय? आजपासून ५ दिवस 'ब्लॉक'; कुठे आणि किती वेळासाठी रोखणार वाहतूक?

भांडण सोडवल्याची 'शिक्षा'; ४५ दिवस तुरूंगवास भोगल्याचा दावा, म्हणाला - “मैं सेंट्रल जेल से गोरा होकर आया”! तरुणाचा VIDEO व्हायरल

महिलेने मध्यरात्री ऑर्डर केलं उंदीर मारण्याचं औषध; Delivery Boy ला आला आत्महत्येचा संशय, मग जे घडलं...

Thane : घोडबंदर घाटात उतरणीवर कंटेनरच्या धडकेमुळे विचित्र अपघात; अनेक वाहने एकमेकांवर आदळली, चालक फरार - Video

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक CORS स्टेशन उभारणार; भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर