नवी मुंबई

डीपीएस फ्लेमिंगो तलावात फुलला पुन्हा गुलाबी रंग; जलवाहिन्यांची दुरुस्ती; तलावात पुन्हा शिरले भरतीचे पाणी

ठाणे खाडीतून नाल्याला जोडणाऱ्या २ जलवाहिन्यांचे दुरुस्तीनंतर ३० एकरच्या पाणथळ जागी आंतर-भरतीचे पाणी पूर्ण ताकदीने शिरल्याने डीपीएस फ्लेमिंगो तलाव पुन्हा एकदा उत्साहाने भरला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : ठाणे खाडीतून नाल्याला जोडणाऱ्या २ जलवाहिन्यांचे दुरुस्तीनंतर ३० एकरच्या पाणथळ जागी आंतर-भरतीचे पाणी पूर्ण ताकदीने शिरल्याने डीपीएस फ्लेमिंगो तलाव पुन्हा एकदा उत्साहाने भरला आहे.

नवी मुंबई महापालिकेने स्वार्थी संस्थांनी अडवलेल्या जलवाहिन्या यशस्वीरीत्या साफ केल्यामुळे आता डीपीएस तलावातील पाणी आत-बाहेर वाहत आहे. जानेवारी-मे २०२४ मध्ये पक्ष्यांच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर फ्लेमिंगो डेस्टिनेशनचे संवर्धनाचे काम करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींचा सदर एक भाग आहे, असे ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

तलाव पुनर्संचयित करण्यात उत्सुकता दाखवणारे वनमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी नवी मुंबई महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांना दोन्ही जलवाहिन्यांमधील अडथळे साफ करण्यास सांगितले होते. नमुंमपा अभियंत्यांनी केवळ अडथळे साफ न करता पाईप्स खाली केले आहेत. जेणेकरून भरती-ओहोटीच्या प्रवाहासोबत पाणी आत आणि बाहेर पडेल. समितीच्या सूचनेनुसार, राज्य सरकारने अलिकडेच डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव दर्जा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत बी. एन. कुमार यांनी राजपत्रित आदेशाद्वारे ते औपचारिक करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच याबाबत आम्ही आशावादी असून लवकरच शहरात सर्वत्र फ्लेमिंगो पर्यटन होईल, असे ते म्हणाले.

येथे साचलेल्या पाण्याने घाणेरडे असलेले एनआरआय पाणथळ जागा देखील संवर्धन राखीव म्हणून घोषित केली जाईल, याची खात्री वाटते.

- जयंत हुदर, लेखक-पर्यावरणवादी.

मंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे, नवी मुंबई केवळ पलेमिंगो शहराच्या टॅगला समर्थन देऊ शकणार नाही. तर गुलाबी रंगही मिळवेल.

-संदीप सरीन, नवी मुंबई पर्यावरण संवर्धन सोसायटी.

गोड्या पाण्याच्या प्रवाहामुळे, शेकडो फ्लेमिंगो तलावात परत येऊ लागल्याचे चित्र पहावयस मिळत आहे. यामुळे पक्षी निरीक्षकांनी त्यांचे मोबाइल आणि डीएसएलआर कॅमेरे घेऊन पाणथळ जागेत गर्दी करायला सुरुवात केली आहे. या प्रकारचे दृश्य पाहण्याची आम्हाला उत्सुकता होती.

- सतीश डबराल, पक्षी निरीक्षक.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

आजचे राशिभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल