Navi Mumbai : ३० लाखांची खंडणी उकळणारा अटकेत; आरोपी पाेलिसांच्या ताब्यात प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

Navi Mumbai : ३० लाखांची खंडणी उकळणारा अटकेत; आरोपी पाेलिसांच्या ताब्यात

ऐरोली येथील शिवसेना (शिंदे गट) स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौगुले यांच्यावर दाखल असलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागून त्यातील ३० लाख रुपये स्वीकारताना रबाळे पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीपकुमार देवमाने याला रंगेहात अटक केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : ऐरोली येथील शिवसेना (शिंदे गट) स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौगुले यांच्यावर दाखल असलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागून त्यातील ३० लाख रुपये स्वीकारताना रबाळे पोलिसांनी मुख्य आरोपी कुलदीपकुमार देवमाने याला रंगेहात अटक केली आहे.

घणसोलीतील विवाहितेने स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौगुले यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कुलदीपकुमार याने एका मध्यस्थामार्फत साहिल चौगुले यांना संपर्क साधला होता. तसेच कोर्टातून बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी १ कोटींची मागणी केली होती. कुलदीपकुमारने नगरसेवक चौगुले यांच्याकडून ५० हजार रुपये आगाऊ रक्कम स्वीकारली होती. त्यानंतर उर्वरित ३० लाखांची रोकड घेऊन आरोपीने चौगुले यांना २९ जून रात्री ऐरोली सैनिक रेसिडेन्सीच्या लॉबीत बोलावले होते. नगरसेवक चौगुले यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पथकाने कुलदीपकुमार देवमाने याने चौगुले यांच्याकडून ३० लाख रुपये असलेली बॅग घेताना पकडले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिनेता इम्रान खानची पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'बहुतेक मी ड्राईव्हला…

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता