नवी मुंबई

Navi Mumbai : सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका व्यक्तीने महिलेसमोर केले गलिच्छ कृत्य

व्हिडिओमध्ये लिफ्टमधील पुरुष महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. या प्रकरणाची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला

प्रतिनिधी

नवी मुंबईतील एका सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. या सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका व्यक्तीने महिलेसमोर गलिच्छ कृत्य केले आहे. या व्यक्तीने केलेले हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या सर्व प्रकारामुळे लिफ्टमधील महिला घाबरलेली दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे आरोपीला अटक केली. एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. ही माहिती त्याने पोलिसांना टॅगही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा येथील मार्बल आर्च नावाच्या सोसायटीमध्ये ही घटना घडली. कार्यकर्त्या बीनू वर्गीस यांनी ट्विट केले की, “एका तरुणाला लिफ्टमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन करताना पाहिले. नवी मुंबईतील मार्बल आर्क येथे ही घटना घडली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासानंतर पोलिसांना सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला, त्यानंतर घटनेची माहिती देण्यात आली. व्हिडिओमध्ये लिफ्टमधील पुरुष महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. या प्रकरणाची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai : अखेर ३० महिन्यांनंतर सायन पूल सेवेत; विद्याविहार, गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलांचे आज लोकार्पण

Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Mumbai : माटुंग्यातील ICT वसतिगृहात नाशिकच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

Mumbai : हजारो कोटींच्या ठेवी मोडल्या, कुठे गेल्या? श्वेतपत्रिका काढा; स्थायी समितीत आक्रमक विरोधकांची मागणी

सौरभ दास, आशुतोष रांका यांची सुटका; CJP नेत्यांबाबत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे आदेश